STORYMIRROR

Rahul Shedge

Others

4.5  

Rahul Shedge

Others

"विठ्ठल रूपी देव"

"विठ्ठल रूपी देव"

1 min
27


हरी उभा हा गोदे तीरी

अहोराञ तो कर्म करी ॥॥


माता-पित्यात 

विठु-रखुमाई 

अनेक रूपे असे तयाची 

अवनीवरी तो ठाई ठाई ॥॥


कधी होई तो शेतकरी,

कधी तो बनतो सेवेकरी

कधी तोच होई रे भिकारी  

सार्‍या जगाचा उध्दार करी ॥॥

 

संघर्षात तो 

धावुनी या येतो 

जीवाला जीवदान देण्या 

शर्थीने प्रयत्न करतो ॥॥


वैकुंठाचा धनी 

सदैव पाठीशी असतो

त्यांच्या दारी कोणता ही 

जात-धर्म नसतो ॥॥


उपकारकर्त्या चरणी 

लीन व्हावे

विठ्ठल-रखुमाईला

त्यातच हो पहावे ॥॥


Rate this content
Log in