STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

4  

Pradnya Sonali Dhamal

Others

विटाळ

विटाळ

1 min
726

आई बाबांची लाडकी मुलगी

बागडते खुशीत घरी अंगणी

अचानक होते कावरीबावरी

ही कसली जादू घडली

आईला चाहूल लागली

सांगू लागली घरात मुलगी आपली मोठी झाली


सगळ्यांनी तिच्यावर बंधने घातली

बिचारी मनातच गुदमरून गेली

वेदना तनाच्या तीव्र होत्या

मनाचीही वेदना सोसेना झाली


आई धीर देऊन समजवू लागली

कर सहन आता तू मोठी झाली

पाठवली सासरी परक्याच्या हवाली

तोही करत होता तिच्यावर जीवापाड प्रेम


चार दिवस तिला मिळे घराचा कोपरा

विटाळ म्हणून बघायच्या सगळ्यांच्याच नजरा

रोज तिच्या कुशीत खुशीत हसतोस ना

मग नुसते नॅपकिन आणायला लाजतोस का


तिच्या सहवासासाठी पाकीट मात्र ऐटीत आणतोस ना

मग तिची त्या दिवसात अवहेलना का

जाणून घ्या तिच्या वेदना घ्या

जवळ प्रेमाने नका करू विटाळ तिचा


द्या हाच पुरावा तुमच्या प्रेमाचा

तीच तर आहे आधारस्तंभ तुमच्या घराचा

तिच्या ह्या विटाळानेच मिळतो ना तुमच्या वंशाचा दिवा

एवढ्याचीच फक्त आठवण ठेवा


Rate this content
Log in