विषय : वादळ
विषय : वादळ
1 min
172
अजूनही घुमतयं मनात माझ्या
तूझ्या आठवणींच तेंव्हाच वादळ
तु विसरली असेल कदाचित
रानातल्या त्या झऱ्याची ओंजळ//१//
दिसत नव्हते रानात कुठे पाणी
शोधताना पाणी हिंडत होतो अनवाणी
तु पहात होतीस नुसती माझ्याकडे
होती नजर तुझी केविलवाणी//२//
हिंडत होतो अनवाणी एकटा
पायात रुतला एक काटा
दिवस तप्त उन्हाचे ते
नव्हती कुठे गोड छटा//३//
सुटले होते तिथे चक्रीवादळ
झाकाळले सारे निळे अंबर
आजही होते आठवण त्या वादळाची
गोष्ट होती ती एके काळीची//४//
