STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

विषय: श्री स्वामी समर्थ

विषय: श्री स्वामी समर्थ

1 min
217

श्री स्वामी समर्थ माऊली

तूच आधार कृपेची सावली

दया क्षमा शांती तुजपाशी

भक्त होतो लीन चरणासी//१//


वाट बिकट ही जीवनाची

आस लागली तुझ्या कृपेची

साथ तुमची आता पाहिजे

करावे दूर संकटांचे ओझे //२//


अनाथांचे नाथ तुम्ही स्वामी

तुम्ही मायबाप तुम्ही अंतर्यामी

जगात नांदावी, सदैव शांती

आरोग्य संपन्न घडावी उत्क्रांती//३//


मनामनाला स्वामींचाच ध्यास

कणा, कणात स्वामींचा वास

स्वामी समर्थांची, विस्तीर्ण नजर

स्वामी नामाचा करू या गजर //४//


Rate this content
Log in