STORYMIRROR

Chandan Dhumane

Others

3  

Chandan Dhumane

Others

विषय -सागरी किनारा

विषय -सागरी किनारा

1 min
269

सोबत आपल्या

सागरी किनारा 

हात हाती तुझ्या

मंद धुंद वारा


 प्रेमभरे हाक

मार सख्या मज

कानात सांगते

गुपीत मी तुज


रम्य निसर्गाच्या

सानिध्यात आहे 

एकमेकांच्या रे

डोळ्यात हो पाहे


क्षण हा सुखाचा

आयुष्यात यावा

साथ तुझीच रे

विश्वास मिळावा.


प्रेमपाशात मी

झोकून हो द्यावे

तुझ्याच मिठीत

सख्या धुंद व्हावे.


सागरी किनारा

कधी पाहताना

आठवणीत रे

तूच रे स्मरावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन