Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

विषय- रंगारंग दुनिया

विषय- रंगारंग दुनिया

1 min
22.1K


सारीच रंगारंग दुनिया

मोहमायेचीच ही नगरी

सारेच इथले खोटे नाटे

प्रेमाच्या रित्याच घागरी


माणसेही इथली नकली

पैशाच्या भवती फिरती

कामाच्या भाराने वाकली

जीवापाड मेहनत करती


पदरी काहीच नाही उरते

उभे आयुष्य वाया जाते

अहोरात्र कष्टच करूनी

 टिकत नाही काही नाते


कुटूंबासाठीच खपूनीया

मिळत नाहीच प्रेममाया

टेकता अंथरूणास पाठ

वेदनारहित होतेच काया


रंगारंग पोकळ ही दुनिया

नाही रहात कसलीच रया

चार तोंडे जगविण्यापाठी

गमावतो सगळी छत्रछाया


Rate this content
Log in