विषय -माझा बाप शेतकरी
विषय -माझा बाप शेतकरी
1 min
210
शेतकरी बाप माझा शेतकरी दादा
न्याहारीला त्याच्या भाकर न कांदा
सकाळच्या पारी शेतावर तो निघतो
झोपेतच लेकरांना मायेने कुरवाळतो
दुपारला माय माझी मळ्यात जाते
दही मिरची अन् भाकरीही आणते
ढवळ्यापवळ्याच्या इमानी साथीने
झुळुझुळु पाटाच्या मंजुळ गतीने
बापाच्या दिसभराची ड्युटी संपते
सांजच्याला पारावर मैफल जमते
भजनकीर्तनात टाळचिपळी वाजते
दिवसभराच्या श्रमाची मरगळ संपते
रात्रीला हरिनाम घेऊन झोपी जातो
उद्याच्या कामाला ताजातवाना होतो
