विषय - माझा बाप शेतकरी
विषय - माझा बाप शेतकरी
1 min
283
बाप माझा हा शेतकरी
मला त्याचा अभिमान
काळ्या मातीत खपतो
राखतो देशाची या शान
घाम गाळी बाप माझा
पिकवतो भाजीपाला
रात्रंदिन खपुनिया
उपवास घडे त्याला
आई माझी सवाशीण
साता जन्माची सोबती
बापासंगे जाते रानां
घाम गाळी त्यासंगती
देश करण्या उज्ज्वल
हात देई मदतीचा
नफातोटा न पाहता
घास देई कमाईचा
पांग कसे फेडू देवा
होऊ कसा उतराई
अशा मायबापाच्या मी
जीव वाहू पायी ठायी
