विषय - जीवन एक रंगभूमी
विषय - जीवन एक रंगभूमी
1 min
177
जगायचेय सुंदर आयुष्य
जीवन आहे एक रंगभूमी
रोजच तिथे वेगळा रंगमंच
सादरीकरणाची संधी नामी
खोटा मुखवटा चेहऱ्यावर
असतोच साऱ्या जणांचा
मुखवट्याआडचा चेहरा
भासेल कितीतरी टणांचा
ओझे मणाचे डोईवर ठेवून
वावरतोय हरेक जण इथे
मृत्यूनंतर उचलायला मात्र
जमतीलच लोकांचे जथे
उपयोगी वेळेला जो पडतो
वास्तवात तोच खरा मित्र
नाटक करण्यात सगळे पुढे
पैशापुढे बदलते सारे चित्र
नकली हास्य ठेवून मुखी
वागतो तोच इथे टिकतो
वास्तवातील झाकून चेहरा
खोटाही माल येथे विकतो