STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

विषय - जाणता राजा

विषय - जाणता राजा

1 min
330

शपथ तुम्हाला या गरीब जनतेची

तुमच्या वचनाला जागलेल्यांची

रयतेला त्रासातून सोडवायला या

राजे पृथ्वीवर तुम्ही पुनर्जन्म घ्या 


तुमच्या गड-किल्ल्यांची पडझड झालीय 

मावळ्यांची सेना डागडूजीला लागलीय             

गड-किल्ल्यांच्या तटावर पाहणीला या

राजे पृथ्वीवर तुम्ही पुनर्जन्म घ्या 


आयाबायांना तुम्ही आई मानलेले

हल्लीच्या नराधमांनी चारित्र्य लुटले 

या नराधमांचे हात कापायला या

राजे पृथ्वीवर तुम्ही पुनर्जन्म घ्या


तुमच्या शौर्यापुढे सम्राट ही नमले

आज मात्र त्यांनी डोके वर काढले

डोक्याला त्यांच्या छाटायला या

राजे पृथ्वीवर तुम्ही पुनर्जन्म घ्या


आज वस्तीतला दादा राजा बनतोय

तुमच्या शौर्याचा इतिहास विसरतोय

इतिहासाची पुनरावृत्ती करायला या

राजे पृथ्वीवर तुम्ही पुनर्जन्म घ्या


स्वार्थी लोकांची इथे झालीय जंत्री

गल्ला भरुन घ्यायला बनतात मंत्री

भाषणांचा त्यांच्या नारा बंद होवु द्या

राजे पृथ्वीवर तुम्ही पुनर्जन्म घ्या


राजे अफजल्या आणिऔरंग्या 

पुन्हा अवतरलेत आपल्या देशात

पाठीमागून भ्याड हल्ला करून

लपतात बहुरुप्याच्या नाना वेशात 


आतंकाच्या नावाने थैमान घालतात

शूर सैनिकांवर पाठी छुपे वार करतात 

असल्या भेकडांना कापायला या 

राजे पृथ्वीवर तुम्ही पुनर्जन्म घ्या


Rate this content
Log in