विषय :- एकांत
विषय :- एकांत
तुटल्यावर हृदय कळते
इथे कुणी नसतं कुणाचं
प्रेमाच्या धुंदीने नकळत
जणू आयुष्यच संपते जसं
ओढ नको ती लागलेली
अखंड साथीच्या सहवासाची
दुरावा अंतरीचा होऊनी निर्माण
शेवटी संगत राही आठवणींची
दुःख उराशी बाळगून जशी
संकटांशी झगडत असतो
वेदना माझ्याही काळजावरील
जखमांना मलम शोधत असतो
अतूट नातं तो प्रेम बंधनाचं
विश्वास ही त्यात अतूट असतं
आपलीच माणसं बदलल्यानंतर
स्वतःलाच स्वतःची ढाल बनावं लागतं
न करता अपेक्षा कुणाकडूनही
स्वतः योग्य मार्ग शोधावे लागते
छळतो एकांत अनेकांना जसा
मात्र मागे न बघता समोर जावे लागते
जीवन जगण्याची नवी ऊर्मी
जगायला मिळते ह्या एकांतात
आपल्यात असलेल्या उणीवाची
जाणीव होते ह्या एकांतात
झालं गेलं विसरूनी आपणास
यशस्वी होण्याचा मार्ग मिळतो
आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात
खरं तर एकांतामुळेच होत असतो
