Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

4  

Neha Ranalkar

Others

*विषय:- चाहूल*

*विषय:- चाहूल*

1 min
166

गर्भारपणात मातेला लागते ती

येणा-या तिच्या बाळाची चाहूल |

चालू लागते मग तीच हळूवार

सांभाळून टाकत एकेक पाऊल | | १| |

आम्रवृक्षा बहर,कोकीळ गाते

वसंताची लागते जेव्हा चाहूल

गुंजन फुलपाखराचे, सुगंधी फुले

पडण्या दृष्टीस वळते पाऊल | | २ |

स्पर्श होताच शीतल गारव्याचा

सारा थकवा क्षणात होतो दूर |

घामाने भिजलेले अंग पाहते वाट

पाण्यात नदीच्या मारण्यास सूर | |३| |

सुखावतो पहिल्या पावसानंतरच्या

मृतिकेच्या ख-या सुगंधाचा दरवळ |

लागते चाहूल वर्षां ऋतूची अन्

मनात भावनांची उठते खळबळ | | ४| |

सृष्टीच्या पडद्यावर रंगते अनोखे 

इंद्रधनुष्याचे अप्रतिम दर्शन |

नयनरम्य त्या सृष्टीच्या निर्मात्याला

करावे वाटती धन्यवाद अर्पण | | ५| ‌‌|

Rate this content
Log in