विषय - भारत माझा देश आहे
विषय - भारत माझा देश आहे
भारत माझा देश आहे नि
सारे भारतीय माझे बांधव
कोरोना विषाणूने घेरलेय
परमेश्वरा तूच यातून सोडव
टाळतेय इतरांचा हस्तस्पर्श
उगाचच घराबाहेर ते फिरणे
नको संसर्ग धोका साऱ्यांना
विषाणूचे ते शरीरात शिरणे
जगावरच कोसळले संकट
प्रयत्न माझाही राष्ट्रासाठी
घरातच हल्ली बसून राहते
ना संपर्क संसर्गाच्या पाठी
उडालीय भीतीने सारी दैना
वापरते घरी मी सॅनीटायझर
हात-पाय नि सारे घर स्वच्छ
राखतेय प्रदूषणमुक्त परिसर
शिंकताना झाकते तोंडनाक
नको इतरां विषाणूचा त्रास
खाऊ घरचेच जेवण ताजे
खाऊन घेते सुखाचा घास
बाहेर जाताना लावते मास्क
गर्दीत जाणे पूर्णत: टाळते
घर माझे ठेवते जंतुविरहित
कापूर घरांदारांतुन जाळते
कोपूच नये कोरोना विषाणू
म्हणूनी राहू सारेच बंदिस्त
सुरळीत होता जीवनक्रिया
खाऊ फिरू खुशीत मस्त
ठेवू संयम मनावर आपल्या
वेळ आलीय ही कसोटीची
मरून जाऊ दे विषाणू पार
नकोत औषधे बनावटीची
