विषय :- आधाराचा हात
विषय :- आधाराचा हात
सुख - दुःखाची प्रसंग
येत असतात जीवनात
संकटकाळी गरजूंना
द्यावा आधाराचा हात
नको श्रीमंतीचा माज
माणुसकीची ठेवावी जाणीव
पैशाने असलात श्रीमंत तरी
आधाराची भासते उणीव
वेळ ही येते प्रत्येकांवर
साथ द्यावी एकजुटीने
हाथ - हाथ मिळवून
मदत करावी प्रत्येकाने
रडणारे डोळे पुसावया
रुमाल नको हाथ हवेत
कुणीतरी येवून तयांपाशी
आधाराचे खांदे द्यावेत
दुःखाच्या हिंदोळ्यावर साथ
देणारा असतो श्रेष्ठ सर्वात
आधाराचा शब्द असो वा
संकटात दिलेला मदतीचा हात
आधार द्यावया मागे पुढे
न बघता समोर करावे हाथ
प्रत्येक वेळ ही सारखी नसते
बळ द्यावे करावया परिस्थितीवर मात
श्रीमंत , गरीब कसला भेद
नसानसांतून वाहतो रक्त लालच
तू कोण नी मी कोण विसरुनी
जगण्या आधाराची बनावी ढालच
