विश्वशांती
विश्वशांती
1 min
406
विश्वशांतीचा ध्यास आम्ही घेतला
स्वतःच्या आत डोकावतांना
आगडोंब दिसला!
आगडोंब विझवण्या बंब बाहेरचे लावले!
बाहेरच्या चकाचकीने
लक्ष आमचे वेधले
आटापीटा करत ते मिळवण्यास धावलो
धावता धावता त्यातच अडकलो
बाहेर पडण्या परत
बाहेरच्यांनाच बोलवले
आतील शांततेने संप पुकारला
विश्वशांतीचा मार्ग खडतर बनवला!
पेटेंट आमच्या विश्वशांती मंत्राचा
फिरंगी घेण्यास सरसावले
जाग मग आम्हास आली
ओरडत राहिलो विश्वशांतीच्या नावाने!!!
