STORYMIRROR

veena joshi

Others

4  

veena joshi

Others

विश्वकल्याण

विश्वकल्याण

1 min
446

अवघे विश्वची माझे घर

सार भरले शब्दा किती

आचरणात ती आणता

नष्ट होई कशी अधोगती


काल्पनिक असो वा सत्य

रामराज्य होते खास

कलियुगातील लोकांना

लागावा सत्य युगाचा ध्यास


सत्य बोलावे नि

सदा सत्य आचरावे

समाजाने समाजाचे

नेहमी कसे भान ठेवावे


सान थोर जाती वर्ण

थोतांड असे सभोवती

हे करण्यातच मानवा

तुझाच सहभाग रे किती?


का वर्णतोस रामायण

तूच घडवतो महाभारत

कलियुग म्हणण्याइतपत

मानवच भाग पाडतात


वेळ नाही संपली पण

रात्र आहे वैऱ्याची ती

संधी नको दवडू खास

सिद्ध कर विश्वनिर्मात्या ती


मानव जन्म करू सार्थक

एकमेका साहाय्य करू

नको क्लेश नको लालसा

निर्माण करू नवा कल्पतरू


सोड महाभारत ते नि

सोड रे तो कैकई मत्सर

प्रेम दे नि प्रेम घे मानवा

अवतरेल सत्ययुग पृथ्वीवर


Rate this content
Log in