STORYMIRROR

vanita shinde

Others

3  

vanita shinde

Others

विश्वासघात

विश्वासघात

1 min
220

नटून थटून बोहल्यावर चढले हसत आनंदाने,

कोवळा बहर चैत्री पालवीसम खुलविला ग मनाने.


स्वप्न पाहण्या रंगूनी गेले मी विसरुनी भूक तहान,

दिशा लाभली आयुष्याला करण्यास अस्तित्वाची जाण.


हळुहळु सरला काळ जसा माझ्या नशिबातील तो पुढे,

आला धावुन विश्वासघात दिले स्वप्नांनाच वेढे.


खेळ खेळुनी असह्य जीवघेणा केले मज ग हैराण,

जगणे मरणे कळेना काहीच जाहले मी बेभान.


किती थट्टा ही नशिबाने मांडलीय माझ्या आयुष्यात,

केला गेला प्रत्येक पाऊली माझा विश्वास घात.


नाही आली दया कुणास मजवर करताना आघात,

फरफट करून दिली ठोकर एकटे पाडले या जगात.


संसार सुखी आनंदे फुलावा होती हीच आशा,

होरपळ होत पडली पदरी माझ्याच केवळ निराशा.


सांगू कुणास मी अंतरीच्या सलणा-या वेदना,

तळमळ होते सोसवेना ग काही थकलेल्या मना.


रास उभी ती दिसे समोर जरी दु:खाच्या डोंगराची,

शिकवण आहे सोबतीला आजही मज संस्काराची.


देते मजला जगण्याची आस ती करुनीया संगती,

निराश मनास सांगून पुन्हा ग संस्काराचीच महती.


Rate this content
Log in