विश्वास
विश्वास
1 min
384
शब्द शब्द छान वेचला
ओळींची रचना जमू लागली
कवितेचा ध्यास लागला
नकळत कविता रचली.....
तरल भावना जपल्या
मनी रूंजी घालू लागल्या
ओठातून बरसू लागल्या
धारारूपांनी कागदी उमटल्या....
कागदावर शब्द स्थिरावले
विश्वासाने लेखन केले
लेखणीत ते विसावले
कवितेत सर्व सामावले......
चारोळीतून कवितेत झेपावले
साहित्याला मिठी मारू लागले
मायेनं पुस्तकात लपले
अखंड प्रेमात बुडाले......
पाऊसधारांप्रमाणे बरसेल
संग्रह माझा कवितांचा
विश्वास आहे सर्वांचाच
साथीदार माझा विश्वासाचा.....
