STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

विश्व लेखणीचे

विश्व लेखणीचे

1 min
405

शब्दाच्या सौंदर्याची आरास 

 हृदयातील भावनांना संजीवनी देत,

विवेकाने चढवलेला साज म्हणजे विश्व लेखणीचे

विविध विचारांचा ओघ वाहतो संचय झालेल्या

मनातून अनुभवाचा खजिना उतरतो झरझरत्या या लेखणीतून 

मन ही मग रमते, हवेहवेसे मज वाटते 

 विश्व लेखणीचे 

कधी रडवी करूणेने तर कधी हसवी चुटकुल्यांनी 

कधी आनंदाच्या लहरींनी उंचबळणारे ह्रदय

कधी दुःखाच्या तीव्रतेने व्यक्त होणारा अंतर्नाद

 जादू की किमया, भावनांनी शब्दरूपी मिळावलेली

अदृश्य जागा असते हे विश्व लेखणीचे 

शब्दरूपी भावना व्यक्त करते मनामनाला ही भावते 

न बोलता येणारी रचनाही मांडते विश्व लेखणीचे

शब्दरूपी फुलात भरला जातो मग मनाचा गंथ

लिहितांनाही मिळतो लेखणीलाही वेगळाच आनंद 

कुणास ठाऊक कसं...

... पण..... कळत नकळत आकस्मिक

घडतं हळवं मन समाधिस्त होऊन

सिद्धहस्त लेखणीतून जगणं मग साकारत

अधीक आवडायला लागतं विश्व हे लेखणीचे

टिपण्यास नयनास सभोवतालचं असतं बरच काही 

दोन-चार शब्द सांडतात अलगद फेर धरून नाचतात 

चौफेर आनंदाने परस्परांशी घट्ट नातं विणतात

सांगून पाहतात हृदयाची स्पंदने

प्रभावशाली सामर्थ्य असे लेखणीचे

मनाच्या कल्पनेचे शब्द एकत्र करणारी

छोटीशी परंतु बलवान ही लेखणी 

परिस्थितीशी समरस होऊन भावार्थ मनी ठेवून चार ओळी लिहिल्या की कविता होते देखणी 

 मनमुराद हास्य ओठांवरती अलगद येऊन 

सुख दुःखात प्रत्येक साहित्यातून साऱ्या व्यथा, भावनांतून लेखणी माझ्यासवे व्यक्त होत राहते

अन् नव्याने आवडायला लागते मज विश्व लेखणीचे


Rate this content
Log in