STORYMIRROR

Sayli Kamble

Others

3  

Sayli Kamble

Others

विश्व कप आणि क्रिकेट

विश्व कप आणि क्रिकेट

1 min
661

क्रिकेट हा एकमेव असा भारतातील लोकप्रिय खेळ

जो लहान थोर प्रत्येक जण पाहतो काढून वेळ


वल्ड कप जसा सुरू होणार असतो

सगळा भारतच जणू सज्ज होवून जातो


गोलंदाज जेव्हा चेंडू फलंदाजाकडे भिरकावतो

प्रत्येक प्रेक्षकच जणू चेंडूचा तो प्रवास जगतो


जेव्हा तो चेंडू आकाशात उंच झेप घेतो

पाहणाऱ्या प्रत्येकाचेच ह्रूदय ठोठावतो


क्रिकेटची चर्चा करण्यास नाही ओळख लागत

प्रत्यक्षात कधीही न खेळणाराही मांडतो स्वत:चे असे मत


पण त्यातूनही जेव्हा भारत पाकिस्तानची मँच असते

युध्दासम वातावरणात इंडियाची लढत सुरू होते


कपिल आणि धोनीने जिंकवून दिला होता विश्व कप या आधी भारताला

तसेच यश मिळून इतिहास रचन्याचे सामर्थ्य मिळो विराटच्याही टीमला


Rate this content
Log in