STORYMIRROR

Snehal Gapchup

Others

3  

Snehal Gapchup

Others

विश्व घेई ऐकची श्वास

विश्व घेई ऐकची श्वास

1 min
56


अवघे विश्व घेई ऐकची श्वास, जीवन हा एकची ध्यास. 

मोक्ष कोणा हवा बरा, जाणिवांचा हा एकची जन्म साक्षी पुरा. 

काय काय थांबवावे, हे अस्तित्व कसे वाचवावे. 

बिनबोभाटसा वाराही थांबून वाहे ऐकलारे. 

एक हात दुसऱ्या हाता बोले, शिवू नको संसर्ग हा साधा नाही बरे. 

कर्म आणि अकर्माचे फळ एकच जाहले.

सत्व गुण पुरुषार्थाने कठोर काळिजे धैर्य ठेवले. 

सृष्टीस चाहूल लागली, आवेई वृष्टी होऊ लागली. 

खंबीर हो आता तू धरणी, विद्दुल्लता बोलली. 


Rate this content
Log in