विसावा
विसावा
1 min
26
दाहीदिशा ह्या मनोहारी
साक्ष देती पवित्र प्रीतीला
विसावलो आज क्षणभर
उपमा ना गोड मिठीला
पंचतत्वे विचरती चोहीकडे
प्रेम तसें हे आपले फुलले
सखी तू मितवा मी तुझा
मनमंदिरात सुगधं भरले
ताजमहाल जरी अजरामर
प्रीत ही आजीवन राहील
वचनात राहू बांधील सदा
दुरावा ना कधी येईल
सुखद भविष्य साकारतोय
स्वप्न रंगीत सारे सजवतोय
समाधानात हातात हात
एकमेकात बघ हरवतोय
