विरोधाभास
विरोधाभास
1 min
259
व्याख्या सौंदर्याची करताना
विलक्षण प्रभाव मनाचा
मनःचक्षुनी पहिले तिला
भास जाहला अप्सरेचा
सुंदर तीच दिसणं
सुखावत होत नेत्राना
भाव होते स्तब्ध माझे
अनंत जन्म रहावे स्मरणा
कोन जाने बदलले सगळे
रूप तिचे वास्तविक
भनक लागली आधुनिकतेची
मावळलें सुंदरतेचे प्रतिक
काळानुरुप परीभाषा बदलली
लाजऱ्या गोजिऱ्या मूखास
लागली नजर फ्याशनची
सौंदर्य लागले दावणीस
भरलाय खोटा बाजार
महागड्या वस्तुनि
कैद केली मोहकता
नकली रंगानी
तोल मोल ना होनार सौंदर्य
कितीही व्यापार जाहला जरी
असली परंपरा ही आपली
कितीही युगे गेली तरी
