STORYMIRROR

Raghu Deshpande

Others

3  

Raghu Deshpande

Others

विनंती...

विनंती...

1 min
173

कालपर्यंत माझ्यासाठी 

जी उघडी होती कवाडे, 

कलुषित मनाने आज 

गाती चुगलीचे पोवाडे...! 


यशाचे दावेदार सारे

अपयशाला वाली नाही, 

चांगले झाले माझ्यामुळे 

वाईटाला कैवारी नाही...! 


कमी अधिक भले बुरे 

जीवनाचा भाग असतो, 

जन्मतःच कुणी गड्यांनो 

कुठे का हुशार असतो...? 


जगण्याचे सोहळे झाले 

व्यवहाराच्या बाजारात 

प्रत्येक गोष्टीला तोलने 

नफा तोटा च्या तराजूत...! 


खुशाल लावा दारे सारे 

मनात ठिकाणा असू द्या, 

आपलाच असे सोबती 

प्रेमळ भावना राहू द्या...!


Rate this content
Log in