विकासाची वाट
विकासाची वाट
.....आज गावाले विकासाची
वाट पुन्हा पुन्हा होती खुणावत
पण नव्हते कुणाला पडले काहि,
याची खंत माझ्या मनाले जाणवत ...
... अर्ध्यापेक्षा जास्ते गाव रात्री
फक्त पाणी पिऊन झोपते उपाशी
आजारपण झालं कुणाला तर
लावले पैसे नाहि आज कुणापाशी ...
.... सरकारी मद्त कुठं पडते
म्हणतां गरजुच्या पदरात
आफिसातुन ती तर सरळ जाती
त्या बाबु लोकांच्या सदऱ्यात ....
.....पडकपुडक घर हे आणखी
बाहेर लागते तापत्या उन्हाची झळ
नाहि दवाखाना जवळपास म्हणुन
घरातच सोसते बाळंतपणाची कळ .....
....तरुण पोरी फिरतात मोकाट ,
नाहि पोरी इथं आता सुरक्षित
चार सहा जण सोडले तर
सारं गाव हे अशिक्षित ...
...नाहि पडला आकाशातुन पाणी
ओसाड पडल्या सारी माळरान
देवा तु तर कुठुन बरं देणार
गावाला या " विकासाचं दान "
....सरतो कसातरी दिन इथं
सारा होते मगं एकदाची रात
निघते प्रेतयात्रा होत लिहुन कुठंतरी
" नंतर कधीतरी करु या विकासाची बात !!!"
