विजयादशमी
विजयादशमी
1 min
248
विजयादशमी
विजय रक्षिणी
लंकेश दहन
राम जय रणी
विनाश पापाचा
उदय पुण्याचा
प्रतिक यशाचा
सण आनंदाचा
दसरा सणाची
श्रद्धा ही शमीची
रक्षीली झाडाने
शस्त्रे पाडंवाची
आपट्याची पाने
श्रींमती सोन्याची
दुखी आप्तेष्टांना
संधी जोडण्याची
देव्हाऱ्यात मान
सरस्वती पुजन
खाते वही जाण
पाटी रेखाटन
मान या सणाला
साडेतीन पैकी
एक हा मुहूर्त
शुभम मान की
मिटावे शत्रुत्व
गोड मान सारे
नवरात्र संध्या
एकरूप खरे
