STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

विजयादशमी

विजयादशमी

1 min
228

झाली मंगल पहाट

दिवस छान उगवला

सजवू घरदार सारे

फुले-तोरण लावू या...


पावन पर्व दसऱ्याचे

विसरू क्षण दुःखाचे

मानुनी आनंद मनात

स्वागत करू सर्वांचे...


मांगल्याचा पवित्र दिन

विजयादशमीचा असे

स्वीकाराव्या शुभेच्छा या

मनापासुनी तुम्हा देतसे...


Rate this content
Log in