STORYMIRROR

Sonam Thakur

Others

4  

Sonam Thakur

Others

विजयादशमी

विजयादशमी

1 min
224

आला विजयादशमीचा सण

चला सीमोल्लंघन करूया

हाती घेऊन आपट्याची पाने

उत्तम विचारांचे सोने वाटुया

उत्सव असे हा आनंदाचा

असत्या वर सत्याच्या विजयाचा

गर्व अंगी धरू नका जन हो

मुख्य संदेश असे या सणाचा

कृत, त्रेता व द्वापार युगात

अवतरले पृथ्वीवर युगपुरुष

करुनि नाश असुरी शक्तींचा

दिला त्यांनी शांतीचा संदेश

अहंकारी रावणाचा नाश झाला

दुष्ट महिषासुरचा वध देवीने केला

अज्ञातवास पांडवांचा संपला

पुरातन महत्व असे या दिवसाला

या विजयादशमीला मिळून

करूया नीच प्रवृत्तीला हद्दपार

स्त्रीशक्ती सशक्तीकरणाला

देऊया आपण सारे पुढाकार

स्त्री असे अनंतकळची माता

द्या तिला ही न्याय समान

आजच्या या विजयादशमीला

करा त्या शारदेचा सन्मान


Rate this content
Log in