विज्ञान
विज्ञान
दूर सारूया अज्ञानाला
जवळ करुया तंत्रज्ञानाला
सृष्टीचक्र समजण्यासाठी
जाणून घेवूया विज्ञानाला
घटनेमागेचे कारण न कळता
अज्ञानाचे अडते तिथेच घोडे
विज्ञानाची मग होता ओळख
अलगद सुटते प्रत्येक कोडे
प्रयोगातून अनूभुती घ्यावी
रसायनांची पहावी गंमत
समीकरणेही सोडवावीत
अणू रेणूंचीही वाटे जंमत
असे का घडते प्रश्न पडावा
जाणून घ्यावे प्रत्येक कारण
बदल पाहूनी चराचरातले
गोंधळून न जावे विनाकारण
चिकित्सकतेला खाद्य पुरवते
विज्ञानातील कारणमीमांसा
मैत्री आपली विज्ञानाशी होता
विषय वाटतो मग हवाहवासा
अंधश्रद्धेला इथे नकोच थारा
ओळख होवू द्या विज्ञानाची
तंत्रज्ञानाच्या युगात आपुल्या
करुया होळी साऱ्या अज्ञानाची
