विज्ञान युग
विज्ञान युग
आले युग विज्ञानाचे.....
नवनवीन तंत्रज्ञानाचे....
वेगवेगळे शोध लागले
जगच सारे बदलून गेले
मिळते माहिती कोणतीही क्षणात
कामे देखील होऊ लागली वेगात
होऊ लागल्या अनेक गोष्टी शक्य
ज्या कधी काळी होत्या अशक्य
मिळू लागला माणसाला आराम
विज्ञानाच्या प्रगतीला खरचं सलाम
येता विज्ञान आणि तंत्रज्ञान
फायदे पण झाले अन् झाले तोटेही
मशीनी करू लागल्या काम
आणि माणूस बनला आळशी
हालचाली झाल्या कमी
होऊ लागल्या आरोग्याच्या हानी
पण मानव झालाय खूपच प्रगत
करून साऱ्यावर मात
केले आणखी ज्ञान अवगत
असतीलच अपवाद काही
पण आरोग्याची काळजीही जपली
विज्ञान आणि तंत्रज्ञानाने...
जगण्याला गती मात्र मिळाली.
