STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

वीस एप्रिल

वीस एप्रिल

1 min
11.8K

सहावा दिवस तेजाचा....!

स हानुभूती अंतरीची

हा गुण सहिष्णुतेचा

वा जवी पेक्षा जास्तच जपला....

दि नरात एक करून

व नवास भोगूनी

स मंजस पणाने विरह साहिला....

ते दिवसच त्यागाचे

जा म बेड्या पायात घालून

चा लणे भाग पडायचे....

    आज तेज फाकता आकाशी

    किंमत त्या क्षणांची कळते

    मागे वळून पाहण्यास मन वळते....

    चांदण्या मोजता मोजता

    त्या रात्री चंद्रच हरवून बसला

    म्हंटले हा रे नशिबाचा फेरा कसला...?

    हळूच हृदयी छबी प्रकटता

    थोडे हायसे वाटले

    पुन्हा तेच दिवस लीलया नटले..!


Rate this content
Log in