वीर कुर्बानी
वीर कुर्बानी
1 min
174
आली आसवे
लाभलेया स्वातंत्र्य
नाही फसवे
विजय ओठी
प्राणाचिया आहुती
जिंदगी खोटी
वीरांची गाथा
आनंदली गाऊनि
भारतमाता
मायेच्या गारा
तुझा सीमा पहारा
सांगतो वारा
गर्व वाटला
तुझ्या छत्र छायेत
जीव थाटला
पहाति मुले
वाट परतण्याची
घेऊनि फुले
आम्ही झोपतो
तुझ्या सभोवताली
काळ कोपतो
वाट पहाते
तुझी सौभाग्यवती
थोडसं खाते
वृदध माऊली
विझवूनी बसली
शांत साऊली
वंदीतो मनी
प्रजासत्ताक दिनी
वीर कुर्बानी
