वीण....!
वीण....!
1 min
374
नारळाच्या काथ्याची दोरी
पाण्यात अंगभर भिजवून ...
गुंडाळा केला
गोल गोल हातावरच
एका लयीत ....
मग तासलेल्या बाजीला
टाकले अंगणात
आणि
विणू लागला बाज
आडव्या उभ्या विणेंनी
एका तालासुरात ....
यथावकाश
बाजीची वीण पूर्ण झाल्यावर
बाजीला थोडं ठेवलं उन्हात
काथ्यातील पाणी सुकण्यास ....
बाजीची ती सुरेख वीण
तो स्वतःशीच पुटपुटला ,
आयुष्यालाही असंच विणता
आलं असतं तर ........
