विहीणबाई
विहीणबाई
लेकाचे लग्न जोरात करताय
विहीणबाई अहो विहीणबाई
लगबगीतच असतेय वरमाय
अख्ख्या मांडवात तिची घाई
ठसका ठुमका असतोय सारा
लेकाच्या लग्नाचा बाजच न्यारा
ल्याली अलंकाराचा सारा साज
भवतीनं सामानाचा हा पसारा
लेकाच्या सासूरवाडीकडूनच
मिळणार तुम्हाला सारे काही
रुसवे-फुगवे चालतात तरीही
शांत कसे बसलेत पहा व्याही
विहीणबाईचा जास्तच हो तोरा
जणू मुलगा तिचा जगावेगळा
मोठमोठ्या आवाजात बोलून
दाखवते तिचा नखरा आगळा
लेकाच्या लग्नात मिरवन सर्वत्र
वाढवतेय कसा स्वतःचा भाव
सुन करेल लेकावर कब्जा की
बसेल कोपऱ्यात करत म्याव
