विघ्नहर्ता
विघ्नहर्ता
1 min
549
देवतांच्या देवा । स्वागतम् राया ।
पडूनिया पाया । धन्य झाले ॥१॥
आला गणपती । घेवूनी शुद्धता ।
वाहे प्रसन्नता । सदनात ॥२॥
पवित्रता नांदे । सुख ओसंडूनी ।
सहवास ॠणी । देवा तुझा ॥३॥
नाम घेता तृप्त । आत्मा होई सार्थ ।
साधे परमार्थ । भक्तगण ॥४॥
अर्पिला नैवेद्य । सुग्रास भोजन ।
करावे प्राशन । लंबोदरा ॥५॥
मज दे आशिष । गणेशा सांभाळ ।
दुःख हे नाठाळ । विघ्नहर्ता ॥६॥
यावा परतूनी । आम्हांस पावावा ।
स्वर्ग तो लाभावा । एकदंता ॥७॥