विद्रोही मी
विद्रोही मी


*विद्रोही मी*
सख्या जरी तू विद्रोही असला तरी
मात्र मी विद्रोही अजिबात नाही
तू केला जुलूम सर्वांवर जरी
तुला मी बोलत मात्र नाही काही....
किती दिवस चालेल तुझी दांडगाई
मी त्याला सामोरी जाईन आनंदात
तुझा हेतू सफल होऊ देणार नाही
तुझ्याबद्दल प्रेम निर्माण करणार मनामनात...
विद्रोही कविता करतोस,लेख लिहितोस
जरा प्रेमाच्या पण कविता लिही
जनमानसात प्रेमाची बरसातही कर
वसुधा तुझ्या प्रेमाची बरसात हर्षाने पाही....
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा - पुणे*
*मो. नं. 9823582116*