STORYMIRROR

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

विधीलिखीत

विधीलिखीत

1 min
250

तुझ्या विचारात माझा विचार नसणे

हे साहजिकच ....!

माझ्या विचारात तु अविचार बनुन बोचणे

हे अगतीकच......!

तुझ्या आठवणीत माझी आठवण नसणे

हे योग्यचं.......!

माझ्या आठवणीत तु आठवण बनुन राहणे

हे सलतच....!

तुझ्या शब्दात माझा अक्षरही नसणे

हे चालायचच.....!

माझ्या शब्दातला प्रत्येक अक्षर तुझ्याच शाहीचा

तरीही लिहायचच....!

तुझ्या आयुष्यात माझी जागा असेल,नसेल

हे गुपीतच......!

माझ्या आयुष्यात तु...रिक्त ,अदृश्य ,आभास

यापलीकडचं सारं ,..विधीलिखीतच !!!!!!


Rate this content
Log in