विचारधारा
विचारधारा
1 min
11.9K
...कुणी चाफा ,कुणी गुलाब
कुणी निशिगंध, कुणी केवडा
कुणी सुसंस्कृत सज्जन, कुणी
रस्त्यावर लोळणारा बेवडा ...
...कुणी इथे कोट्याधीश, कुणी
रस्त्यावर भिक मागत बसलेला
कुणाला मंदिरातील मुर्तीत तर
कुणाला माणसात देव दिसलेला ...
...कुणी जिवन सार्थक लावलेलं
कुणी त्याला नाव ठेवत बसलेला
कुणी हळुहळु यशाचे शिखर चढत ,
कुणी अपयशाने एकदम खचलेला ...
... कुणी व्रतवैकल्ये ,पुजापाठ करणारा ,
कुणी बुध्दीला पटेल तिच वाट धरणारा
कुणी देवाला चारदा रोज नैवद्य घालणारा ,
कुणी देवाचे अस्तित्वाला नको ते बोलणारा ...
