STORYMIRROR

Meera Bahadure

Others

2  

Meera Bahadure

Others

विचारधारा गौतमांची

विचारधारा गौतमांची

1 min
64

हा बुद्ध विचार प्रगतीचे दार

ज्ञानाचे भांडार, देवाचा अवतार करि उद्धार मानवाचा

ही वाणी गौतम बुद्धांची, उपदेशाची, ज्ञानाची अन पंचशील तत्वांची

मिळवण्या मुक्ती शांती ज्ञानाची ओंजळ भरती

ही विचार धारा गौतमांची


क्रोधास जिंकू प्रेमाने

वाईटास सद्गगुनाने

स्वार्थास उदारतेने खोट्यासही जिंकून घेऊ सत्याच्या मार्गाने

ही शिकवण गौतम बुध्दांची

ज्ञानप्राप्ती अन यशप्राप्तीची

शांतीमय जीवन जगण्याची


बसून पिंपळ वृक्षाखाली

ज्ञान साधना अन तपश्चर्या ही केली

त्या मार्गाने ज्ञानप्राप्ती ही झाली

बुद्ध हे नाव ज्ञानाचे गाव

सुरवात परिनिर्वाणाची,


आर्यसत्ये चार बुध्दांची

दु:ख, तॄष्णा,निरोध अन प्रतिपद

ही नावे आहेत त्याची

अष्टांग मार्ग ही कलाच देती 

जीवन जगण्याची.. 


गरज बुध्दांच्या विचारांची

आज जाणवते धरती वरती

जे नर भुवर कापाकापी करती

घेवून ज्ञान द्यावे सुख समाधान

बुद्ध जन्म घ्या धरती वरती



ही भुमी तरसत आहे

ढग ही बरसत आहे

विचारधारा द्यावी तुमची माणसास जगण्यासाठी

हा बुद्ध विचार मुक्ती चे दार

ज्ञानाचे भांडार देवाचा अवतार

करी उद्धार मानवाचा...


Rate this content
Log in