विचारांचा गुलाम
विचारांचा गुलाम
1 min
241
सगळं संपलंय आता, काय लीहायचय काही कळेना.
व्यक्त होताना मन, विचार मांडायची सवय सुटेना.
मग ते कसेही असो, चांगले वाईट छोटे मोठे.
विचारांच्या प्रवासात, मन पोहोचंते कोठे च्या कोठे.
पाहायला आणी दिसायला, काय म्हणावा तो एकांत.
हजारो विचारांचा काहूर, मग बसू द्या कितीही निवांत.
आराम तो काय फक्त, पचतो तो शरीराला.
कितीही थकला तरी, मेंदू लागतो विचारांच्या कामाला.
काहीही विचार नसताना, लिहिण्याचा विचार आला.
लागला लगेच कामाला, पहा या विचारांच्या गुलामाला.