STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

विभागणी रंगांची

विभागणी रंगांची

1 min
11.9K

सध्या बोलाबाला फक्त तीन रंगांचा

'रेड', 'ग्रीन' व 'ऑरेंज' चा

बाकी सगळे रंग हद्दपार

तासातासाला जगात बारकाईने

नजर ठेवतात सर्वजण!!!


काळजाचा ठोका चुकतो

'ग्रीन' बदलताच 'रेड' मधे

टाळ्या, शाबासकीची थाप

'रेड' बदलताच 'ऑरेंज', 'ग्रीन' मधे

सुरक्षित रहा घरामधे!!!


धारेवर धरले आहे

बघता बघता ह्या रंगांनी

जगातल्या श्रीमंत प्रगत देशांनाही

लढावे लागत आहे डोळ्या न दिसर्या

शत्रुचा 'रेड' रंग सिमेवरी!!!


हवे आहे आता

या 'रेड', 'ऑरेंज' रंगांपासुन सुटका

हवा आहे एकच रंग 'ग्रीन'

माणुसकीचा एकच धर्म

जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात!!!


Rate this content
Log in