व्हाट्सअपची दुनिया
व्हाट्सअपची दुनिया


कोणे एके काळी मजकूर पत्राच्या माध्यमाने पोहोचायचा
उत्तर येईपर्यंत आठ-दहा दिवसाचा काळ असायचा
हा काळ एका सेकंदावर आला
व्हाट्सअपने तो करून दाखवला
लगेच उत्तर मिळू लागले
सोबत फोटोही सेंड होऊ लागले
सकाळ उजाडते ती गुड मॉर्निंग मेसेजने
रात्र सरते ती गुड नाइटने
गप्पाचा कट्टा व्हाट्सअप ग्रुपमध्ये सुरु झाला
तासनतास चॅटिंगवर वेळ जाऊ लागला
व्हिडिओ कॉलमुळे प्रत्यक्षात भेटण्याचा आभास होऊ लागला
व्हाट्सअप असणे आता झाले गरजेचे
प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये तो दिसे
लहानापासून मोठ्यांपर्यंत
गेली जादू सगळ्यावर
आता व्हाट्सअपशिवाय जगणं झालंय मुश्किल फार
व्हाट्सअपची दुनिया आहे अजब यार