STORYMIRROR

Sayli Kamble

Others

4  

Sayli Kamble

Others

वेळेचे महत्त्व

वेळेचे महत्त्व

1 min
2.1K

कितीही धावले तरी वेळेला कधी गाठता येत नाही

कितीही वाटले तरी वेळेला कधीच थांबवताही येत नाही


भविष्याची तरतूद करताना वर्तमान हातून अलगद निसटून जातो

क्षणार्धातच हा वर्तमानकाळ भूतकाळात गणला जातो


हल्ली प्रत्येकाचे आयुष्य हे घड्याळाच्या काट्यानुसार चालते

कोणी लोकलमागे तर कोणी त्यांच्या स्वप्नांमागे धावते


वेळेचा वेग आपण आपल्या कामानुसार नि मुड नुसार ठरवतो

कधी वेळ जाता जात नाही तर कधी वेळ अपूराच पडतो


वेळेचे महत्व हे सगळ्यांनीच जाणायला हवे

येणार्या सर्व क्षणांचे आनंदाने स्वागत करण्यास शिकायला हवे


Rate this content
Log in