वेल.....
वेल.....
1 min
231
झाडाला बिलगली
आपले समजून,
त्याने मुळी कापली
समजून उमजून...!!
एक नाटक होते
आधार देण्याचे
जवळीक करून
फायदा घेण्याचे...!!
फारच हळवी
विश्वास टाकते
मग असा केसाने
कुणी गळा कापते..!!
कलियुग राधे
इथे श्याम नाही
वचनामध्येही
कुठे राम नाही...!!
नाजूक वेली
निपचित पडली
घटना भयंकर
अवचित घडली..!!
कुठे ना बोभाटा
आलबेल झाले
डागांसवे मग
जगणे आले...!!
