वेळ
वेळ
1 min
244
जी कोणाचीच होत नाही
तिलाच तर वेळ म्हणतात
ती जेव्हा लागते डगमगू
तेव्हा सारे धावू लागतात
वेळ आली की कळते
आपले आणि परके
नाहीतर वाटतात इथे
आपल्याला सारेच सारखे
ती मात्र वेळेवर आपल्याला
सर्व गोष्टी शिकवते
वेळोवेळी नवनवीन
गोष्टी आपल्याला दाखवते
तिचा जो झाला गुलाम
त्याचे जीवन व्यर्थ
तिला बनवले ज्याने गुलाम
त्याच्या जीवनाला खरं अर्थ
