वेळ
वेळ
1 min
270
वेळ काय आहे?
वेळ आहे आयुष्यातल्या परीक्षेची,
माणसाला माणूस म्हणून घडवण्याची।
वेळ आहे शून्याला नवा अर्थ देण्याची ,
जखडलेल्या पंखांना नवे बळ देण्याची|
वेळ आहे स्वतः शांत राहून चांगला भूतकाळ आठवण्याची,
आनंददायी भविष्य घडवण्याची |
वेळ आहे वाईटाचा प्रतिकार करण्याची,
चांगुलपणाचा पुरस्कार करण्याची|
खरंच आता वेळ आहे काहीतरी वेगळे करण्याची|
