STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

वेळ

वेळ

2 mins
197

एक वाजला बाई एक वाजला

सोनूने मस्त केक खाल्ला,केक खाल्ला....


दोन वाजले बाई दोन वाजले

आईने सर्वांना जेवण वाढले....


तीन वाजले बाई तीन वाजले

आजीने छान बेसनाचे लाडू वळले...


चार वाजले बाई चार वाजले

आजोबांनी झाडाला पाणी घातले....


पाच वाजले बाई पाज वाजले 

चहासाठी सारे हाॅलमधे जमले....


सहा वाजले बाई सहा वाजले

सोनू राजू बागेत खेळायला गेले.....


सात वाजले बाई सात वाजले

घरातील दिवे प्रज्वलीत केले....


आठ वाजले बाई आठ वाजले

सोनू,राजू आता अभ्यासात रमले....


नऊ वाजले बाई नऊ वाजले

 जेवणासाठी टेबलवर सारे जमले....


दहा वाजले बाई दहा वाजले

चला रे लवकर अंथरूण घातले....,


अकरा वाजले अकरा वाजले

टी.व्ही. करा बंद सारे बघा झोपले....


बारा वाजले बाई बारा वाजले

सर्व आता छान स्वप्नात दंग झाले...


Rate this content
Log in