STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

वेळ कुटुंबाचा

वेळ कुटुंबाचा

1 min
458

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ कुठे आहे कोणाला?।

कुटुंब जोडून ठेवावे, ही आस कुठून स्पर्शेल मनाला?॥


नवरा-बायको रोज सकाळी, कामानिमित्त दोन दिशांना।

पाळणाघरात बाळ वाढते, आणि "डे-केअर" सासू-सास-यांना॥


मोलकरीण घेते शेजारून किल्ली, करते साफसफाई घराची।

गाठच कधी पडत नाही; तर कशी करेल ती स्वच्छता मनाची?॥


बाळ आसुसले प्रेमासाठी; आई नाही, तरी आजी मिळावी।

रात्री उशिरा घरी येणाऱ्या, बाबांची कधी माया कळावी॥


दोन घास भरवू देत आईने, जागत राहती डोळे इवले।

चव आईच्या हातची लाभावी, जेवण जरी बाईने बनवले॥


वेळ काढून बाळासाठी, ताट चिमुकले आई सजवते।

भरवणार जरी घास बाळाला, मोबाईलची रिंग वाजते॥


हिरमुसलेले बाळ अखेरीस, आजीच्या हातांनी जेवते।

"बाबा कधी येणार परतून", आजीला विचारून दमते ॥


पेंगुळलेल्या डोळ्यांमध्ये, बाळ पाहते स्वप्न पहाटे।

वेळ काढून कुटुंबास्तव, आई-बाबा जोडती घरटे॥    



Rate this content
Log in