वेगळेपण
वेगळेपण
1 min
52
नका वापरू वेगळेपण सिग्नलवर भीक मागण्यासाठी
धडधाकट माणसांना कशाला पांगळ्यांची काठी?
मायेच्या स्पर्शाला असतो का कधी लिंगभेद
झिडकारलं कोणी तरी नका मानू खंत नी खेद.
मानाने कमवा कष्टाची मीठ भाकरी
शिक्षण-कर्तृत्वावरच मिळवा कुठलीही नोकरी.
प्राणवायूवर आहे सर्वांचा समान अधिकार
जात,धर्म,लिंग असल्या भेदांच्याही पार!
