STORYMIRROR

Raakesh More

Others

4  

Raakesh More

Others

वेदना

वेदना

1 min
591

वेदनेतूनच शायरी जन्म घेते 

खुशी तर वांझोटी असते 

वेदना चिरकाळ साथ देते 

खुशी मात्र खोटी असते ||0||


भावनेचा ओलावा विचारा वेदनेला 

सुखाची नशा क्षणिक असते 

वेदना जखम देते तिथे 

अनुभूती मात्र अगणित असते

असह्य वेदना देणारी मात्र 

जखम फार छोटी असते 

वेदना चिरकाळ साथ देते 

खुशी मात्र खोटी असते ||1||


वेदना शरीराची असते, 

वेदना मनाची असते 

हृदयाच्या वेदनेसारखी 

जीवघेणी कोणतीच वेदना नसते 

प्रेमभंगाची वेदना मात्र 

चक्रव्यूहाची कसोटी असते 

वेदना चिरकाळ साथ देते

खुशी मात्र खोटी असते ||2||


वेदना हृदयावर वार करते 

असह्य अत्याचार करते 

राहून राहून माणसाला 

प्रत्येक क्षणी बेजार करते 

जगायचं कसं दुःख गिळून 

शिकवण फार मोठी असते 

वेदना चिरकाळ साथ देते

खुशी मात्र खोटी असते ||3||


सुखाच्या भूलथापा नेहमीच 

फसवं जग थाटतात 

वेदना मात्र सर्वांना 

कटू इथे वाटतात 

वेदनेच्या आघातात नेहमीच 

एक सच्ची सचोटी असते 

वेदना चिरकाळ साथ देते

खुशी मात्र खोटी असते ||4||


Rate this content
Log in